गडचिरोलीविदर्भ

कुरखेडातील ११ पानठेलाधारकांवर दंडात्मक कारवाई

गडचिरोली : कुरखेडा शहरातील शाळा, विद्यालयांच्या परिसरासह विविध ठिकाणी पानटपरी थाटून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थविक्री करणाऱ्या ११ जणांवर कारवाई  करण्यात आली आहे. कोटपा कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून २ हजार २०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. प्रशासन व मुक्तीपथने ही कारवाई केली.

सुगंधित तंबाखूचे दुष्परिणाम लक्षात घेता, शासनाने तंबाखूविक्रीवर प्रतिबंध लावले आहे. तरीसुद्धा पानटपरीवर खर्रा, सिगारेट, तंबाखूसह तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होताना दिसते. सध्या तंबाखूचे व्यसन युवक वर्गात खूप मोठ्या प्रमाणात आहे. एकदा का तंबाखू सेवन केले मग वारंवार करू लागतो. याचे रूपांतर सवयीत होते आणि मग व्यसन लागते. तरुणवर्गच नाही तर पुरुष व महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात या व्यसनात बुडालेले आहेत. तंबाखूमुळे कर्करोग होतो. छातीत दुखणे, हृदयविकार झटका येणे, रक्तवाहिन्या विकार इत्यादी रोग जडतात. या तंबाखूजन्य पदार्थ विक्री विरोधात कुरखेडा शहरात मोहीम राबवित मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोबतच 11 पानठेलाधारकांवर एकूण 2 हजार 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत ग्रामीण रुग्णालय येथील NCD विभागाच्या समुपदेशक निशा चचाने, लॅब टेक्निशियन रश्मी मोगरे, पोलिस स्टेशन मधून पीएसआय आघाव व सहकारी, नगर पंचायत कार्यालय येथील समीर नंदेश्वर, मुक्तीपथ कार्यालयतर्फे शारदा मेश्राम संघटक, जीवन दहिकर प्रेरक, अतुल पोरटे स्पार्क कार्यकर्ता आदी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button