गडचिरोलीविदर्भ

राजाराम (खां.) येथील जिओ आणि बीएसएनएल टॉवर बनले शोभेची वस्तू ; नागरिक त्रस्त

नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची तीव्र समस्या; ऑनलाइन कामे आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प

अहेरी : तालुक्यातील राजाराम खांदला येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीएसएनएल आणि जिओ या प्रमुख मोबाईल टॉवर्सच्या कनेक्टिव्हिटीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. टॉवर उभारून अनेक वर्षे झाली असली तरी, बॅटरी नसणे किंवा अचानक नेटवर्क गायब होणे अशा समस्यांमुळे दोन्ही टॉवर सध्या केवळ शोभेची वस्तू बनले आहे.

मागील काही दिवसांपासून जिओ आणि बीएसएनएलचे नेटवर्क दिवसभर सातत्याने गायब असते किंवा अत्यंत कमी येते. मंगळवारी (दि. ९) दिवसभर ही समस्या अधिक तीव्र होती. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण आणि अभ्यास करण्यावर याचा मोठा परिणाम होत आहे. या परिसरात शासकीय व प्रशासकीय ऑनलाईन कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याने, नेटवर्क नसल्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोकांनी बीएसएनएलचे सिम कार्ड बंद करून एअरटेल, जिओ आणि इतर कंपन्यांचे सिम कार्ड वापरणे सुरू केले आहे. मात्र, अनेक नागरिकांचे बीएसएनएलचे नंबर शासकीय व महत्त्वाच्या ठिकाणी लिंक असल्यामुळे, नाईलाजाने त्यांना बीएसएनएल व जिओला पर्याय म्हणून इमर्जन्सीसाठी दुसरे सिम कार्ड घ्यावे लागले आहे. यामुळे लोकांना अधिकचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. राजाराम खांदला परिसरातील मोबाईल धारकांनी बीएसएनएल व जिओच्या टॉवरमधील समस्या लवकरात लवकर सुधारून अखंडित सेवा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button