गडचिरोलीविदर्भ

ताडगाव येथील एकलव्य आश्रम शाळा तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प

गडचिरोली : विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीचा संस्कार रुजवण्यासाठी आणि शाळा परिसर आरोग्यदायी राखण्यासाठी भामरागड तालुक्यातील ताडगांव येथील एकलव्य शासकीय आश्रम शाळेत ‘मुक्तीपथ’ अभियानांतर्गत शाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेला ‘तंबाखूमुक्त शाळा’ करण्याचा संकल्प घेण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात कोणत्याही प्रकारच्या व्यसनांच्या आहारी न जाता व्यसनमुक्त राहण्याचा सामूहिक संकल्प केला. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुक्तीपथच्या तालुका संघटिका नीळा किन्नाके यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे घातक दुष्परिणाम आणि सामाजिक समस्यांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. शाळेने तंबाखूमुक्त शाळेचे सर्व निकष पूर्ण करण्यासाठी पावले उचलली असून यासाठी एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.

या मोहिमेत शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. राठोड व ए. ए. रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक विमल कुमार यादव, ज्योती जून, पूजा प्रजापती, एस. डी. पाडेकर, जी. आर. स्वामी, अजय शर्मा, नेहा तिवारी, आणि मोनी यादव, मनदीप भारद्वाज (लेखापाल), सुशील कुमार यादव (ग्रंथपाल), नितीन कुमार (प्रयोगशाळा सहाय्यक) आणि आदित्य कुमार (कनिष्ठ सचिवालय सहाय्यक) यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापकांनी शाळेला आदर्श व व्यसनमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button