गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयात हत्तीरोग प्रतिबंधक सामुदायिक औषधोपचार व रुग्ण शोधमोहीम

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष औषध सेवन करून केला हत्तीरोग निर्मूलनाचा संकल्प

गडचिरोली : जिल्ह्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘आयडीए-२०२६’ (IDA-2026) या सामुदायिक औषधोपचार व रुग्ण शोध मोहिमेला वेग आला आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथे विशेष आरोग्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष औषध सेवन करून हत्तीरोग निर्मूलनाचा संकल्प केला.

आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने विद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांना हत्तीरोगाची लक्षणे, प्रतिबंधक उपाय आणि औषधोपचाराचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. केवळ माहिती देऊन न थांबता, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली सर्व पात्र विद्यार्थ्यांना सुरक्षित पद्धतीने हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप करून त्यांचे प्रत्यक्ष सेवन करून घेण्यात आले.

या मोहिमेत आरोग्य सेवक समाधान मुळे, आरोग्य सेविका जांभुळकर सिस्टर, तसेच आशा सेविका माया दिवटे आणि मीनाक्षी मसराम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे म्हणाले, “विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता आहे. आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेली ही मोहीम हत्तीरोगासारख्या गंभीर आजाराला मुळापासून उपटून टाकण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.”

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पर्यवेक्षक अजय वानखेडे, गजानन अनमुलवार, रवींद्र कोरे, सैनिकी निर्देशक ध्यानी, अनिल रक्ताटे आणि सचिन धकाते यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button