गडचिरोलीविदर्भ

तेंदूपत्ता संकलन करताना रानडुकराचा हल्ला, तिघे जखमी

वनविभागाने जखमींना तातडीने रुग्णालयात केले दाखल; खुर्सा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गडचिरोली : तालुक्यातील खुर्सा (नवेगाव) परिसरात रविवारी सकाळी तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या नागरिकांवर रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात १६ वर्षीय मुलगी आणि दोन पुरुष असे एकूण तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. खुर्सा येथील नागरिक नेहमीप्रमाणे गावाशेजारील शेतशिवारात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेले होते. अशातच दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक नागरिकांवर हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. या घटनेत राजू एकनाथ मेश्राम (वय ४० वर्ष), सावन पुरुषोत्तम चुधरी (वय २६ वर्ष), चंदा आबाजी कटाणे (वय १६ वर्ष) हे तिघे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमींना तात्काळ गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिन्ही जखमींची प्रकृती स्थिर असून असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर वनविभागाने पुढील तपास सुरू केला असून, तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button