क्राईमभंडाराविदर्भ

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह ७.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

लाखांदूर : लाखांदूर पोलिस स्टेशनच्या पथकाने नांदेड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीवर यशस्वी धाड टाकली. या कारवाईत विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण ७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक फौजदार दिगंबर तलमले, शिपाई आकाश सोनुने आणि किशोर टेकाम हे रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना नांदेड रेती घाटावरून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक निशांत जुनोनकर यांना कळविले. पथकाने नांदेड येथील शिवाजी टी-पॉइंटजवळ संशयास्पद ट्रॅक्टरला (एमएच ३६ एल ५९२२) थांबवून तपासणी केली. यावेळी ट्रॉलीमध्ये अंदाजे १ ब्रास रेती आढळून आली. ट्रॅक्टरचालक विठ्ठल तिमाजी साठवणे (वय ५२, नांदेड) याला रेतीच्या रॉयल्टीबाबत विचारले असता, त्याने कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे कबूल केले. चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button