गडचिरोलीविदर्भ

पोटगाव येथील आरोग्य उपकेंद्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते बालकांना डोस ; ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ चा नारा

देसाईगंज : ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे’च्या अंतर्गत देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात २८ जून रोजी बालकांसाठी विशेष लसीकरण सत्र उत्साहात पार पडले. या महत्त्वपूर्ण मोहिमेचा शुभारंभ क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते लहान चिमुरड्यांना पोलिओचे ‘दोन थेंब’ पाजून करण्यात आला.

देशातील प्रत्येक बालकाचे भविष्य पोलिओसारख्या आजारापासून सुरक्षित राहावे, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी आमदार कृष्णा गजबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “भारताला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी आणि येणारी पिढी सुदृढ व निरोगी घडवण्यासाठी प्रत्येक पालकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक या डोसपासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे,” असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.

या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विद्या कृष्णा गजबे, पोटगावचे सरपंच विजयजी दडमल, उपसरपंच पंकज वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या बालकांना सुरक्षिततेचे कवच देण्यासाठी पोलिओ बूथवर आणून लसीकरण करून घ्यावे, असे जाहीर आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने या प्रसंगी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button