क्राईमगडचिरोलीविदर्भ

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली पोलिसांची अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई, दोन ट्रकसह ८८ गोवंशीय जनावरे जप्त; ३८.२० लाखांचा मुद्देमाल ताब्यात

आठवडाभरात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात सलग चौथी मोठी कारवाई; आतापर्यंत १४५ जनावरांची सुटका

 

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली पोलिसांची अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई, दोन ट्रकसह ८८ गोवंशीय जनावरे जप्त; ३८.२० लाखांचा मुद्देमाल ताब्यात

आठवडाभरात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात सलग चौथी मोठी कारवाई; आतापर्यंत १४५ जनावरांची सुटका
गडचिरोली, दि. २६ ऑगस्ट : अवैध गोवंश वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, एटापल्ली पोलिसांनी आज पहाटे मोठी कारवाई करत दोन ट्रकसह तब्बल ८८ गोवंशीय जनावरे जप्त केली आहेत. या कारवाईत वाहनांसह एकूण ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात करण्यात आलेली ही सलग चौथी मोठी कारवाई आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांसह गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार एटापल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. २५ ऑगस्टच्या रात्री एटापल्ली पोलीस पथक शहरात रात्रगस्त घालत असताना, गोपनीय बातमीदाराकडून एटापल्लीमार्गे गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मौजा आलेंगाटोला येथील कसनसूर–आलापल्ली मार्गावर सापळा रचला. २६ ऑगस्ट रोजी पहाटे संशयास्पदरीत्या एक ट्रक येताना दिसताच पोलिसांनी रस्त्यावर तात्पुरता अडथळा निर्माण करून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर चालकाने मौजा गुरुपल्ली येथे ट्रक सोडून जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
Etapalli police in Gadchiroli district take major action against illegal cattle trafficking, 88 cattle along with two trucks seized; Goods worth Rs 38.20 lakh seized
पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये कत्तलीसाठी विनापरवाना घेऊन जाण्यात येणारी गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयपणे कोंबून भरल्याचे आढळून आले. दरम्यान, याच मार्गाने आणखी एका ट्रकमधून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुन्हा रस्त्यावर नाकाबंदी केली. पोलिसांनी रस्ता अडवल्याचे लक्षात येताच दुसऱ्या ट्रकच्या चालकाने वाहन थांबवून तेथेच सोडले आणि जंगलाच्या दिशेने पळ काढला.
पंचांसमक्ष दोन्ही ट्रकची तपासणी केली असता,
– ट्रक क्रमांक TS 08 UB 5779 — ४० गोवंशीय जनावरे, किंमत ६ लाख रुपये
– ट्रक क्रमांक AP 16 TE 1238 — ४८ गोवंशीय जनावरे, किंमत ७ लाख २० हजार रुपये
– दोन्ही ट्रकची अंदाजे किंमत — २५ लाख रुपये
असा एकूण ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सर्व ८८ गोवंशीय जनावरांसह दोन्ही ट्रक पोलिसांनी जप्त केले असून, अज्ञात वाहनचालक व मालकांविरुद्ध एटापल्ली पोलीस ठाण्यात अप. क्र. १६९/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(क), ११(१)(ड), ११(१)(घ), महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ६, ९ तसेच कलम ११९ म.पो.का. १९९१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात वाहनचालक व मालकांचा शोध सुरू असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छींद्र नागरगोजे करीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. गेल्या आठवडाभरात कोटगुल, कुरखेडा आणि एटापल्ली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून, या कारवायांमधून एकूण १४५ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे., उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छींद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोउपनि. किशोर पायघन, पोहवा गंगाधर वट्टी, पोअं भुपेंद्र कारीहरताल, चंद्रशेखर शेकुर्तीवार, शामु मडावी, जयराम पुंगाटी, रोशन पुराम, मोहन शिंदे आणि प्रविण वैरागडे यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button