अमरावतीक्राईमविदर्भ

चार सराईत दुचाकी चोरट्यांना अटक ; १५ दुचाकी जप्त

अमरावती : शहरातून दुचाकीचोरी करणाऱ्या नागपूरच्या चार सराईत चोरांना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १५ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. प्रणव संजय ठाकरे (२३), करण गणेश उके (१८, दोघेही रा. खामला, नागपूर), प्रणव सुरेश मारबते (२०, रा. हनुमाननगर, वानाडोंगरी, नागपूर) व ऋषिकेश रवी कुंबरे (१९, रा. जयताळा, नागपूर), अशी अटक चोरांची नावे आहेत.

शहरातील मंगलधाम परिसरात प्रोफेसर कॉलनी येथील रहिवासी सुमेध साळुंखे यांची दुचाकी घरासमोरील पार्किंगमधून लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी साळुंखे यांनी ३० जून रोजी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास आरंभला. गुन्हे शाखेचे युनिट-२ ही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासात या गुन्ह्यात प्रणव ठाकरे याचा हात असल्याचे समोर आल्यावर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. साथीदार करण उके, प्रणव मारबते व ऋषिकेश कुंबरे यांच्यासोबत अमरावती व नागपूर येथून अन्य दुचाकी चोरल्याचेही त्याने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button