
संघाचे प्रांत सेवा प्रमुख सुनील मेहर यांची विशेष उपस्थिती
धानोरा : धानोरा सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांसारख्या अभ्यासिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानाची संधी या अभ्यासिकेतून मिळावी याकरिता नगरपंचायत धानोराच्या वतीने अभ्यासिका केंद्राचे लोकार्पण करण्यात येत असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घेऊन आपले लक्ष्य गाठावे, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी धानोरा नगरपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या अभ्यासिका केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी केले.
धानोरा नगर पंचायतच्या वतीने निर्मित अभ्यासिका केंद्राचे लोकार्पण आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून संघाचे प्रांत सेवा प्रमुख सुनीलजी मेहर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा सयाम, उपाध्यक्ष ललित बरछा, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, पाणी पुरवठा सभापती प्रदीप बोगा, महिला बाल कल्याण सभापती देवांगिनी चौधरी, स्वच्छता सभापती नरेश चिमुरकर, नगरसेविका अर्चना गुरनुले, नगरसेवक मलिक बुधवानी, नगरसेवक रामू मोहुर्ले, नगरसेविका चौधरी, नगरसेविका वैशाली धाईत, नगरसेविका प्रतिभा गुंडावार, नगरसेवक शत्रू मोहुर्ले, नगरसेविका अल्का मशाखेत्री, नगरसेविका किरंगे, स्थापत्य अभियंता मंगेश नाकाडे, शहर अध्यक्ष सारंग साळवे, मधुकर कन्नाके उपस्थित होते.



