गडचिरोलीविदर्भ

आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते श्री हनुमान मंदिर मठ बांधकामाचे भूमिपूजन

देसाईगंज : तालुक्यातील कसारी येथील श्री हनुमान मंदिर मठ येथे ६ ऑगस्ट रोजी नवनिर्मित बांधकामाचे भूमिपूजन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून नारळ फोडून करण्यात आले.

यावेळी पं.स.चे माजी सभापती गोपाल उईके, सरपंच प्रदीप मडावी, उपसरपंच रवी काशीवार, मनोहर शेंडे, विसोराचे सरपंच रमेश कुथे, शंकरपूरचे सरपंच वालदे, तुळशीचे सरपंच चक्रधर नाकाडे, कोंढाळाच्या अपर्णा राऊत, विजू झवर, बलदेव भट्टकर, नगरसेवक रवी गोटफोडे, नबीर फुले, शामराव गायकवाड, मधुकर दुणेदार, वसंत कनाके, राघो कुंभारे, केशव सोनवाणे, तेजराम बोरकर, श्रीराम वाघाडे व परिसरातील भाविक, कसारी येथील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button