चंद्रपूरविदर्भ

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली

नागभीड तालुक्यातील येनोलीमाल जवळील घटना

बसमधील १३ प्रवासी सुरक्षित 

नागभीड : चिमूर येथून १३ प्रवासी घेऊन भरधाव वेगाने निघालेली बस येनोली माल येथील तलावाच्या वळणावर उलटली. ही भीषण घटना बुधवारी (दि. ७) दुपारी १२:२० वाजता घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, दरवाजातून निघण्याचा मार्ग बंद झाल्याने निशाण लावून प्रवाशांना बाहेर काढावे लागले.

चिमूर स्थानकातील एम. एच. ४० वाय ५२६७ क्रमांकाची बस चिमूर-नेरी- व्हाया येनोली ते तळोधी येथे सकाळी निघाली. या बसमध्ये १३ प्रवासी होते. ही भरधाव बस येनोली माल तलावाच्या वळणावर आली. दरम्यान, रस्ता अरुंद असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून शेतात उलटली. यामध्ये बाहेर निघण्याचा मार्ग बंद झाला. ही माहिती चालक रमाकांत येरमे व वाहक रामदास धारणे यांनी पोलिस व नागरिकांना दिली. तळोधी पोलिसांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले. निशाण लावून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिस वाहनाने सर्वांना तळोधीला पोहोचवून दिले. पुढील तपास ठाणेदार अजितसिंग देवरे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button