गडचिरोलीविदर्भ

पूर्वाध्यक्षांचे सेवाकार्य, शिक्षण कार्य आणि ध्येयधोरण सतत सुरू ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध – मनोज वनमाळी

स्व. किशोर वनमाळी यांच्या चतुर्थ पुण्यतिथिनिमित्त महात्मा गांधी महाविद्यालयात ‘सेवा दिन’ कार्यक्रम

यानिमित्त आयोजित रक्तदान, आरोग्य तपासणी आणि दिव्यांगांना मदत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

आरमोरी : संस्थेचे पूर्वाध्यक्ष स्व. किशोर वनमाळी यांचे सेवाभावी विचार आणि ध्येयधोरण हे आमच्यासाठी आदर्श अनुसरणीय असून ते अविरत चालू ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आज संस्थेचे वटवृक्षात झालेले रुपांतर हे पूर्वाध्यक्षांच्या श्रमाचे फलित आहे. आरोग्याची आणि आर्थिक  परिस्थितीची पर्वा न करता स्व. किशोर वनमाळी यांनी त्यांच्या हयातीपर्यंत अहोरात्र संस्थेच्या विकासासाठी कार्य केले. त्यांची प्रेरणा आम्हास सकारात्मक कार्य करण्याचे बळ कायम देत राहील. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून संस्थेचे कार्य पुढेही चालू ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे प्रतिपादन म.शि.प्र. मंडळ आरमोरीचे सचिव मनोज वनमाळी यांनी केले.

स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात आयोजित संस्थाध्यक्ष स्व. किशोर वनमाळी यांचा चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. १० ऑगस्ट हा दिवस स्व. किशोर वनमाळी यांचा स्मृतिदिन महाविद्यालयात ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर आणि दिव्यांगाना मदत अशा कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

यावेळी मंचावर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुनिता वनमाळी, संस्थेचे पदाधिकारी दिपक बेहरे, उमाकांत वनमाळी, दिपक वनमाळी, अशोक वनमाळी, हरिश्चंद्र बोंदरे, मयुर वनमाळी, गीता गारोदे, समस्त वनमाळी परिवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, संजय लोणारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार, म.गांधी कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पंधरे, वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कालर्सचे प्राचार्य नितीन कासार, कार्यक्रमाचे आयोजक शशिकांत गेडाम, रासेयो प्रमुख डॉ. गजेंद्र कढव उपस्थित होते.

तत्पूर्वी महाविद्यालय परिसरातील स्व. किशोर वनमाळी यांच्या प्रतिमेचे  संस्थेचे सदस्य मयूर वनमाळी यांचेकडून पुष्पमाला अपर्ण करून पूजन करण्यात आले. याशिवाय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दिपक बेहरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला अशोक वनमाळी तर स्व. वामनरावजी वनमाळी यांच्या पुतळ्याला उमाकांत वनमाळी यांनी पुष्पमाला अपर्ण करून आदरांजली वाहिली आणि दोन मिनिटे मौन पाडण्यात आले.

श्रद्धांजली कार्यक्रमात डॉ. अमोल धात्रक, डॉ. चिखराम, डॉ. सौ. धात्रक यांनी स्व. किशोर वनमाळी यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला आणि त्यांच्या आठवणीना उजाळा दिला. सेवादिनानिमित्त दिव्यांगांना साहित्यवाटप करण्यात आले. त्यात आधारकाठी, वॉकर, याचा समावेश होता. शिवाय त्यांना व गरजूंना राशन कीट व ब्लान्केट चे वाटप करण्यात आले. एकूण ६२ दिव्यांगांना सदरील वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांनी संस्थेप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यात एकूण १८ जणांनी रक्तदान केले व स्व. किशोर वनमाळी यांच्या प्रति आदरांजली वाहिली. आरोग्य तपासणी शिबिरात १०० च्या वर लोकांनी सहभाग घेतला व आपली आरोग्य तपासणी करून घेतली त्यात रक्तचाचणी, सीबीसी टेस्ट, हिमोग्लोबिन टेस्ट, सिकल सेल टेस्ट, महालॅब टेस्ट आदीचा समावेश होता. रक्तचाचणी, आरोग्यतपासणी शिबिरास जिल्हा रुग्णालय गडचिरोली, उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथील आरोग्य पथक व महालॅबच्या पथकाने मदत केली.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी केले आणि आयोजनाची भूमिका विशद केली तसेच उपस्थितांचे स्वागत केले. संचालन डॉ. विजय रैवतकर यांनी केले तर आभार प्रा. शशिकांत गेडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी  मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळातील पदाधिकारी, वनमाळी कुटुंबीय, महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचा रक्तदान करण्यात विशेष सहभाग होता. शिवाय परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला व रक्तदान करून स्व. किशोर वनमाळी यांना आदरांजली अर्पित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. शशिकांत गेडाम, रासेयो प्रमुख प्रा. डॉ. गजेंद्र कढव , डॉ. सीमा नागदेवे, प्रा. मोहन रामटेके, डॉ. वसंता कहालकर, प्रा. दिलीप घोनमोडे, डॉ. विजय गोरडे, डॉ. मनोज ठवरे, प्रा. गजानन बोरकर, प्रा. सुनंदा कुमरे, प्रा. अनिल राऊत, प्रा. निखिल  बोरोडे, प्रा. कविता खोब्रागडे, प्रा. प्रणाली गारोदे, प्रा. अर्पीत खरवडे, खुशाल रामटेके, प्रशांत दडमल, किशोर कुथे, महात्मा गांधी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळातील पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button