
भंडारा : खेळताना रुमालाचा गळफास लागून बालकाचा मृत्यू झाला. जयेश कैलास रहांगडाले (वय ११ वर्षे) रा. हरदोली असे मृत बालकाचे नाव आहे.
जयेश हा नवीन घराच्या किचनमध्ये खेळत असता रुमालाने गळफास लागला. काही वेळानंतर त्याची आई किचनमध्ये आली असता जयेश हा बेशुद्धावस्थेत दिसून आला. त्याला तुमसर येथील शासकीय रुग्णालयात भरती केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी मर्ग नोंद केला आहे.



