गडचिरोलीविदर्भ

गावा-गावात मादक द्रव्य नियंत्रण समीत्या सक्रीय करा – तहसीलदार प्रशांत गड्डम

कोरची मुक्तिपथ तालुका समितीची बैठक 

कोरची : तालुक्यातील विविध गावातून अवैध दारू व तंबाखू विक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी पेसा कायद्याअंतर्गत गाव पातळीवर मादक द्रव्य नियंत्रण समित्या सक्रिय करण्यासाठी विविध उपाययोजना करून व्यसनमुक्त तालुका निर्माण करण्यासाठी संबंधित विभागाने कामाला लागण्याचे आवाहन मुक्तिपथ तालुका समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी केले.

कोरची मुक्तिपथ तालुका समितीची बैठक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आपले कार्यालय हे मंदीरासारखे ठेवण्यासाठी भिंतीवर खर्रा खाउन पिचकारी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा. संपुर्ण ग्रामपंचायत समित्या पुनर्गठित करून तसा ठराव तालुका समीतीला पाठवा. पेसा कायदा नुसार मादक द्रव्य नियंत्रण समीत्या सक्रीय करण्यास सुचना देण्यात आली. शासकिय-निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करुण व्यसनमुक्त कार्यालय निर्माण करावे. ६ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना खर्रा पासुन कोसो दुर ठेवण्यासाठी नगरपंचायत, ग्रामपंचायतने अवैध तंबाखु-खर्रा विक्रेत्यांना नोटीस देण्याविषयी सुचना देण्यात आली. मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समीती, पदाधिकारी यांनी शाळा परिसरातील खर्रा विक्री करणाऱ्यांना तिन वेळा नोटीस द्या व त्यानंतर कारवाई करा. वनविभागाने जंगल गस्ती दरम्यान मोहफुलाच्या भट्ट्या उध्वस्त करावे. पोलीस ठाणे, पोमकें असलेल्या गावात अवैध दारु विक्री बंदी करा, आदी मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

बैठकीला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ए.बी. थुल, पोलिस निरीक्षक एस.एल. ठाकरे, शिक्षण विभागाचे पी.डी. वनवकर, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. मगरे, एन.जे. कारकों, एन.जे. कोतकोंवार, तालुका संघटक  निळा किन्नाके, रुपेश भैसारे, विनोद भोयर, सामाजिक कार्यकर्ती प्रांजली मेश्राम, अशोक घाटघुमार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button