गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

पंतप्रधान मोदी बोलतात तसे करून दाखवतात – आ. डॉ. देवराव होळी

कोट्यावधी लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण मोदीजींनी पूर्ण केले

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आभासी पद्धतीने घरकुल धारकांना चावी वितरण

गडचिरोली : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवल्याप्रमाणे लोकांना मोठ्या प्रमाणावर घरांची बांधकामे पूर्ण करून दिली. सर्वसामान्य गरीब जनतेचे घराचे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवले.  आतापर्यंत जे आश्वासन जनतेला दिले ते त्यांनी पूर्ण केली आहेत ते जसे बोलतात तसे करून दाखवतात असे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित घरकुल धारकांच्या चावी वितरणाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोली जिल्हा कार्यशाळा गडचिरोली या अंतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण” टप्पा-१ द्वारे लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने चावी वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला खा. डॉ. नामदेवराव किरसान, जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार तथा अधिकारी व कर्मचारी, लाभार्थी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्यात. घरकुल पूर्ण झालेल्या ज्या लोकांना घराची चावी मिळाली त्या घरकुलधारकांचे त्यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button