पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात सामाजिक कार्यक्रम

माजी खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वात महिला व बाल रुग्णालयात रूग्णांना फळे वाटप व रुग्णालय परिसरातील स्वच्छता
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, गडचिरोलीच्या वतीने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील महिला व बाल रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटपाचा तसेच रुग्णालय परिसराची स्वच्छता करून सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत त्यांना सुख, समृद्ध, आनंददायी, आरोग्यदायी जीवन लाभो अशी ईश्वरचरणी मनोकामना केली.
यावेळी जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गिता हिंगे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, कामगार आघाडीचे प्रदेश सदस्य गोवर्धन चव्हाण, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, डॉ. धुर्वे, डॉ. प्रशांत पेंदाम, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, ता. महामंत्री बंडू झाडे, माजी न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, अल्पसंख्यांक आघाडी नेते सलिमभाई, शहर महामंत्री विनोद देवोजवार, भुपेंद्र कुळमेथे, देविदास नागरे, रमेश नैताम, सिमा कन्नाके, अविनाश विश्रोजवार, राकेश राचमलवार, प्रशांत अल्मपटलावार, तसेच मोठया संख्येने कार्यकर्ते व दवाखान्यातील कर्मचारी उपस्थित होते.



