धक्कादायक: ‘बीएएमएस’च्या विद्यार्थिनीचा झोपेतच मृत्यू…

विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील घटना
चंद्रपूर : शहरालगत असलेल्या वांढरी येथील विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात बीएएमएसच्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा अचानक झोपेतच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पडोली पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. आचल प्रमोद गोरे (वय २३) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती जगन्नाथ बाबा मंदिर वणी जिल्हा यवतमाळची रहिवासी आहे.
आचल ही येथील विमलादेवी मेडिकल कॉलेजमध्ये बीएएमएसच्या चौथ्या वर्षांची विद्यार्थिनी होती. २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ती तिच्या मैत्रिणींसोबत जेवण करून झोपायला गेल्या. मध्यरात्री अचानक आचल किंचाळली अन् बेशुद्ध पडली. तिच्या मैत्रिणीने लगेच याबाबतची माहिती वॉर्ड बॉयला दिली. त्यांनी तिच्या नातेवाइकाला याबाबत कळून तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू असून नेमका मृत्यू कशाने झाला हे लवकरच कळेल, असे पडोली ठाण्याचे ठाणेदार योगेश हिवसे यांनी सांगितले.



