गोंदियाविदर्भ

लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा

स्वीप आयकॉन शशिकांत चौरे यांचे आवाहन

गोंदिया : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी जागरुक नागरिक म्हणून निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हा स्वीप आयकॉन प्राध्यापक शशिकांत चौरे यांनी केले.

शशिकांत चौरे म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक हा एक राष्ट्रीय उत्सव आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीप सेलच्या माध्यामातून मतदार जागृती अभियानाअंतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नविन मतदार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांच्यासह सर्व मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केले पाहिजे. पहिल्यांदाच मत देणाऱ्यांनी लोकशाहीने दिलेली ही अभिमानाची संधी गमावू नका. लोकशाहीमध्ये निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो. हा उत्सव जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्याच्या उद्देशाने येत्या 20 नोव्हेंबर रोजी अवश्य मतदान करा व मतदान करायला जातांना आपल्याजवळ ओळखपत्र ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button