गडचिरोलीविदर्भ

संविधान दिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठात व्याख्यानाचे आयोजन

गडचिरोली : संविधानाच्या ‘अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्यावतीने २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता गोंडवाना विद्यापीठामध्ये डॉ. विकास जांभूळकर यांचे 75 Years of Indian Constitutionalism या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. विकास जांभूळकर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे राहणार असून, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संविधान सन्मान महोत्सव समितीच्यावतीने सदर कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले असून कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी सर्वांना व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button