क्राईमगडचिरोलीविदर्भ

शेतालगत फासे लावून चितळाची शिकार ; चार आरोपींना अटक 

अहेरी : शेतालगत फासे लावून चितळाची शिकार केली. त्यानंतर मांसाची विल्हेवाट लावण्यासाठी अन्य तिघांना बोलावून वाटणी केली व मांस आपापल्या घरी शिजविले; पण यापैकीच एकाने शिकारीचे बिंग फोडले. चितळाची शिकार झाल्याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी चारही आरोपींना अटक केली. ही कारवाई सोमवार, ९ डिसेंबर रोजी दुपारी अहेरी वनपरिक्षेत्रात करण्यात आली.

शंकर रामा आत्राम, किशोर मल्लेश सडमेक, मल्लेश येर्रा सडमेक, मुकेश कलमशाही मडावी रा. विजयपूर ता. मुलचेरा, अशी आरोपींची नावे आहेत. अहेरी तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोटलाचेरू गावाच्या जंगलात रविवार, ८ डिसेंबर रोजी सकाळी एका चितळाची शिकार करण्यात आली. शिकारीनंतर अन्य तिघांना बोलावून मांसाची वाटणी केली. याबाबतची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर सोमवारी दुपारी चारही आरोपींकडून शिजवलेले शिल्लक मांस जप्त केले. अहेरी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाची अधिक तपास एसीएफ विलास चेन्नूरी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button