
गडचिरोली : भारताचे माजी पंतप्रधान आणि जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले व उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली.
शोकसभेत डॉ. सिंग यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रद्धांजली वाहिली.



