गडचिरोलीविदर्भ

बाबलाई माता वार्षिक पुजा व सांस्कृतिक संमेलनात माजी पंस सदस्य हर्षवर्धनराव आत्राम यांची उपस्थिती

भामरागड : तालुक्यातील बेजुर या गावाला लागून बाबलाई मातेचे मंदिर आहे. दरवर्षी येथील आदिवासी बांधव व गैर आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने वार्षिक यात्राचे आयोजान करत असतात. जल, जंगल, जमीन यावर आधारित असणारे आदिवासी बांधव नवीन वर्षाची आतुरतेने वाट बघत असतात.

१ जानेवारी ते ३ जानेवारी पर्यंत बाबलाई माता वार्षिक पुजा व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन भामरागड पट्टी पारंपरिक गोटुल समितिच्या वतीने करण्यात येते. माता बाबलाई ही आदिवासी बांधवांची आराध्य देवी आहे. शेकडो वर्षांपासून परिसरातील लोक येथे पारंपरिकरित्या एकत्र येत पुजा पाठ करत असतात.

या क्षेत्रातील आदिवासी बांधव व गैर आदिवासी बांधव एकत्र येतात व बाबलाई मातेची पुजा करतात. माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव आत्राम यांनी उपस्थिती दर्शवून मातेचे दर्शन घेऊन या पूजेसाठी आलेल्या नागरिकांना अन्नदान वाटप आणि त्या बाबलाई मातेच्या मंदिरात मुक्काम करणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप करून त्यांना मदत केली.

यावेळी कमलापूरचे माजी सरपंच तथा पेसा अध्यक्ष सांबय्या करपेत, बाबुराव तोर्रेम, तिरुपती मडावी, योगेश तलांडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणी भामरागड इलाका पट्टीतील सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button