
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव उमेदवाराचा पराभव नसून भारतीय जनता पक्षाच्या हजारो लाखो कार्यकर्त्यांचा पराभव आहे. या पराभवाला कार्यकर्त्यांनी खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागून संघटनात्मक बांधील बूथ रचना, बूथ सशक्तिकरण करावे. राज्य सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांकरिता महिला करिता मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना चालू केली. या योजनेचा ग्रामीण भागातील प्रत्येक महिलांना लाभ मिळावा त्याकरिता ‘घर घर चलो’ अभियानांतर्गत ग्रामीण भागामध्ये जाऊन योजनेची माहिती व महिलांचे फॉर्म भरून त्यांना सहकार्य करा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी कार्यकर्त्यांना केले.
कोरची तालुका कार्यकारणी व समीक्षा बैठक जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली स्व. मोरेश्वर फाये विद्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी समीक्षाबैठकी मध्ये कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सोबतच कार्यकर्त्यांसोबत संघटनात्मक चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीला जिल्हा सचिव आनंद चौबे, तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, देवराव गजभिये, डॉ. एस.के. बिसेन, नारायण खंडेलवाल, शांती मडावी, सुगना कोटेंगे, शीला सोनकोतरी, प्रमिला मांडवे, जया सहारे, मानुरम कुमरे, मेघश्याम जमकातन, सदाराम नूरुटी, फतेचंद घोडेवाला, स्वप्निल कराड़े, प्रशांत कराडे, टेमलाल देवांगन, खिलेश बागडेरिया, गोविंद दरवडे, नंदू पंजवानी, रामकुमार नाईक, सुरेश काटेंगे, संतोष सर्पा, रवी बंसोड, रामलाल नुरूती, मडावी, साओजी बोगा, मधुकर मेश्राम, ईश्वर नुरूटी, मनोज टेंभूर्ने, गजानंद भारद्वाज, बापुजी उइके, आसाराम शेंडे, रामशिला राउत, तसेच पदाधिकारी/कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



