गडचिरोलीविदर्भ

दोन ड्रम गुळ सडवा नष्ट ; दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल

सिरोंचा पोलिस व मुक्तिपथची संयुक्त कृती

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील नारायणपूर गावात सिरोंचा पोलिस, गाव संघटना व मुक्तीपथ टीमने संयुक्त कृती करीत एका दारू विक्रेत्याकडील दोन ड्रम गुळाचा सडवा जप्त करून नष्ट केला.

नारायणपूर गावात मुक्तीपथतर्फे दोन दिवसीय सघन भेट उपक्रम घेण्यात आले. यादरम्यान, गावातील महिलांची बैठक घेऊन दारूविक्रीबाबत सद्यस्थिती जाणून घेतली असता, गावात जवळपास 9 विक्रेते सक्रीय असून अवैध दारूविक्री करतात. गाव संघटनेच्या माध्यमातून विक्रेत्यांना वारंवार सूचना करूनही अवैध व्यवसाय बंद न केल्याने व्यसनाचे प्रमाण वाढले असल्याचे सांगितले. यावेळी अवैध दारूविक्रत्यांविरोधात मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार सिरोंचा पोलिसांच्या मदतीने मुक्तीपथ टीम व गाव संघटनेने दोन विक्रेत्यांच्या घरी धडक दिली. तपासणीदरम्यान एका विक्रेत्याच्या घरी दारू गाळण्यासाठी टाकलेला दोन ड्रम गुळाचा सडवा व साहित्य मिळून आले. पोलिसांनी पंचनामा करून संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला. तसेच इतर दारूविक्रत्यांना पुन्हा दारूविक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देत अवैध व्यवसाय बंद करण्याची सूचना करण्यात आली.

ही कारवाई पीएसआय कुलकर्णी, पीएसआय वांगाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटिका सुनीता भगत, प्रेरक सोनी कोंड्रा व गाव संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button