गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा डॉ. श्याम खंडारे, वित्त व लेखाधिकारी सी. ए. भास्कर पठारे, संचालक परीक्षा व मुल्यमापन डॉ. धनराज पाटील, नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार, यांच्यासह अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे महत्व विषद करताना म्हणाले, महाराष्ट्राची रचना भाषिक स्तरावर झाली असून, मराठी भाषिकांचे राज्य निर्माण होणे म्हणजे काय तर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये मराठीचा अधिकाअधिक वापर करुन ही केवळ एक भाषा नसून ती ओळख, संस्कृती आणि विचारांचा वारसा आहे, त्यामुळे आपल्या पुढच्या पिढी पर्यंत तिचे महत्व पोहचवले पाहिजे.

याप्रसंगी सगळ्या जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त त्यांचेही स्मरण करण्यात आले. सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. संचालन आणि आभार प्रददर्शन मराठी विभाग प्रमुख डॉ. सविता सादमवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button