
माजी खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेचा यशस्वी प्रारंभ
अहेरी : भारतीय जनता पक्षाच्या विशेष सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ अहेरी विधानसभेत या विधानसभेतील प्रमुख माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. आलापल्ली आणि मुलचेरा येथील जनतेने या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद दिला.
आलापल्ली बसस्थानक परिसरात मोहिमेची सुरुवात करत अशोक नेते यांनी स्थानिक दुकानदार, पानठेला विक्रेते, फुटपाथ व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी भाजपाच्या विचारधारेशी जोडण्याचे आवाहन करत पक्षाच्या सामाजिक आणि विकासात्मक दृष्टिकोनावर भर दिला. मुलचेरा येथेही मोहिमेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला.
८८००००२०२४ या क्रमांकावर मिस कॉल देऊन ऑनलाइन नोंदणीसाठी सोपी पद्धत उपलब्ध करून देण्यात आली. मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागांत ऑफलाइन फॉर्मद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली. भाजपाच्या या मोहिमेद्वारे पक्षाच्या धोरणांवर जनजागृती करत अधिकाधिक लोकांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न झाला.
अहेरी विधानसभेत अशा मोहिमा राबवून पक्षाचा विस्तार करणे, जनतेच्या विश्वासाला बळ देणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला पक्षाशी जोडून त्यांच्या विकासाला चालना द्यावे असे आवाहनही माजी खा. अशोक नेते यांनी यावेळी केले.
या अभियानात प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, मच्छिमार आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन मदने, भाजयुमो जिल्हा महामंत्री सागर डेकाटे, तालुका महामंत्री सुकमल हलदार, महिला नेत्या रहिमा सिद्धीकी, पोशालू चौधरी, अभिजीत शेंडे, हर्षित वर्मा यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले.
या सदस्यता मोहीमेत मुलचेरा येथील प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, मुलचेरा तालुकाध्यक्ष संजयजी सरकार, ता.महामंत्री सुभाष गणपती, जिल्हा सचिव बादल शहा, विधान वैद्य, यांसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



