गडचिरोलीविदर्भ

सचिन मोतकुरवार यांची ‘एआयवायएफ’च्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

गडचिरोली : ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या (AIYF) १७ व्या राज्य अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्याचे युवा नेते कॉ. सचिन मोतकुरवार यांची राज्याचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. अमरावती येथे नुकतेच संपन्न झालेले हे अधिवेशन राज्यातील युवक चळवळीसाठी महत्त्वपूर्ण ठरले.

कॉ. सचिन मोतकुरवार हे मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, दलित, वंचित, विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, संघटनात्मक बांधणी केली आणि भांडवली व्यवस्थेविरोधात नेहमी आवाज उठवला आहे. यापूर्वी त्यांनी AISF, AIKS आणि CPI च्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक आंदोलनांचे यशस्वी नेतृत्व केले आहे.

अमरावती येथे झालेल्या राज्य अधिवेशनात राज्य कार्यकारिणीच्या इतर पदांसाठीही निवड झाली, त्यानुसार कॉ. आरती रेडेकर (कोल्हापूर) यांची राज्याध्यक्षपदी, तर कॉ. सागर दुर्योधन (अमरावती) यांची सचिवपदी निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून कॉ. विकास गायकवाड (छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह कॉ. सचिन मोतकुरवार यांची निवड झाली आहे. नयन गायकवाड (अकोला) यांची सहसचिवपदी आणि कॉ. इकबाल हुसैन खान (ठाणे) यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे.

कॉ. सचिन मोतकुरवार यांची राज्य उपाध्यक्षपदी झालेली निवड ही गडचिरोली जिल्ह्यातील युवकांच्या संघर्षाला मिळालेले राज्य स्तरावरील यश आहे. युवकांचे प्रश्न, शिक्षणातील अन्याय, बेरोजगारी आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध त्यांनी घेतलेली कणखर भूमिका आजच्या परिस्थितीत प्रेरणा देणारी आहे. AIYF महाराष्ट्र राज्याच्या या नव्या नेतृत्वाकडून आगामी काळात पुरोगामी आणि परिवर्तनवादी युवक चळवळीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button