गोंदियाविदर्भ

केटीएस सामान्य रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा

आहार, जीवनशैली बदलांवर मार्गदर्शन ; ३० वर्षांवरील नागरिकांना नियमित रक्त शर्करा तपासणीचा सल्ला

गोंदिया : विज्ञान युगात मानवाची प्रगती झाली असली तरी मधुमेह यांसारख्या शारीरिक व्याधी वाढत आहेत. भारत हा मधुमेहाचा सर्वात मोठा बळी ठरत असल्याने या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त, शुक्रवारी के.टी.एस. सामान्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, वैद्यकीय तज्ञ डॉ. गुरुप्रकाश खोब्रागडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती जयस्वाल, फिजीशियन डॉ.पोषण बिसेन, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरजंन अग्रवाल, बालरोग तज्ञ सचिन उईके, मुखरोग तज्ञ डॉ. अनिल आटे, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी, आयईसी विभागाचे प्रशांत खरात उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करून झाली..

डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी “मधुमेह हा वेदनाविरहित आजार आहे आणि तो इतर अनेक आजारांचा धोका वाढवतो. तहान-भूक अधिक लागणे, वारंवार लघवीला जाणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. मधुमेहपूर्व स्थिती हा एक इशारा असतो, त्यामुळे सुरुवातीलाच काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. अभिजीत गोल्हार यांनी मधुमेह, त्याची लक्षणे, सकस आहार, नियमित व्यायाम, व्यसन नियंत्रण व तणाव व्यवस्थापन या विषयी रुग्णांना मोलाची माहिती दिली. फिजीशियन डॉ. पोषण बिसेण यांनी विशेषतः वय वर्ष ३० च्या वयोगटातील सर्व लोकांनी नियमित रक्त शर्करा तपासणी करण्याचा सल्ला दिला.

डॉ. स्नेहा वंजारी (जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम) यांनी माहिती दिली की, शासनाच्या वतीने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व आरोग्य संस्थांमध्ये मधुमेह संदर्भात रक्त शर्करा पातळी तपासणी निशुल्क केली जात आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. ज्योती राठोड, डॉ. अमोल राठोड, रेखा सपाटे, अर्चना शिवणकर, स्वाती पाटील, उज्वला सेलोकर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button