
गडचिरोली : मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान किमान कार्यक्रमानुसार ऑगस्ट-२०२४ मध्ये “गरीबी निर्मुलन योजना-२०१५ व बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजना” या विषयावर कार्यक्रम घेणेबाबत निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष विकास एस. कुलकर्णी यांचे आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, नगरपरिषद आरमोरी व तहसिल कार्यालय, आरमोरी यांचे संयुक्त विद्यमाने २० ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता तहसिल कार्यालय, आरमोरी येथे कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.
कायदेविषयक जनजागृती शिबीरास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील हे उपस्थित होते. जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, तहसिलदार उषा चौधरी, नायब तहसिलदार दोनाडकर, वाकुलकर, लाडे व राऊत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित पुंडे यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उषा चौधरी यांनी उपस्थितांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना या बाबत माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी उपस्थितांना गरीबी निर्मुलन योजना-२०१५ व बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजना या बाबत सखोल माहिती दिली.
कायदेविषयक शिक्षण शिबिराचे संचालन कार्यालय अधिक्षक प्रितेश काटेखाये यांनी केले तर आभार कनिष्ठ लिपीक जितेंद्र भोयर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वरिष्ठ लिपीक एन.आर. भलमे, कनिष्ठ लिपीक एस.के. चुधरी आणि शिपाई एस.एस. नंदावार यांनी अथक परिश्रम घेतले.



