गडचिरोलीविदर्भ

अकार्यक्षम आरोग्य सेवेच्या निषेधार्थ शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर ‘हल्लाबोल’

आरोग्यसेवा सुरळीत न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या कक्षाला कुलूप ठोकणार – अरविंद कात्रटवार यांचा इशारा

गडचिरोली : तालुक्यातील अमिर्झा आरोग्य उपकेंद्रातील ढासळलेल्या आरोग्य सेवेच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मंगळवारी जिल्हा परिषदेवर ‘हल्लाबोल’ आंदोलन केले. पक्षाचे नेते अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेला धडक देत आरोग्य प्रशासनाला धारेवर धरले. रिक्त पदे तातडीने भरून आरोग्य सेवा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

अरविंद कात्रटवार यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात अमिर्झा आरोग्य उपकेंद्रातील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. उपकेंद्रात दोन कायमस्वरूपी आरोग्यसेविका, एक आरोग्य सेवक आणि इतर अनेक पदे रिक्त असल्याची माहिती त्यांनी दिली. या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या अमिर्झा, भिकारमौशी आणि मौशीचक या गावांमध्ये आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, रुग्णांना उपचारांसाठी गडचिरोलीला जावे लागत आहे. यामुळे रुग्णांचा वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास वाढत असल्याचे कात्रटवार यांनी निदर्शनास आणून दिले.

धुंडेशिवनी येथील कंत्राटी आरोग्यसेविकेची अमिर्झा येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली असली तरी, एकट्या आरोग्यसेविकेची दमछाक होत असून रुग्णांना योग्य सेवा मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोलीसारख्या ठिकाणी ही परिस्थिती असेल, तर दुर्गम भागातील आरोग्य सेवेची काय स्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी, असे ते म्हणाले. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेकडे शासन आणि जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे यामुळे स्पष्ट दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमिर्झा आरोग्य उपकेंद्रातील रिक्त पदे तातडीने भरून गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ देण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. अन्यथा, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या कक्षाला कुलूप ठोकण्याचा इशारा अरविंद कात्रटवार यांनी यावेळी दिला.

या आंदोलनात यादव लोहंबरे, संजय बोबाटे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, तेजस धंदरे, रंजीत वलादे, सचिन मडावी, मधुकर बावणे, सुरज वलादे, संदिप नरुले, मनोहर निलेकार, विशाल गुरनुले, जितेंद्र निकोडे, राजेंद्र मेश्राम, गणेश ठाकरे, अमोल चौधरी, शुभम चंद्रगिरे, आरीफ ढवळे, साहिल कारेते, रमेश आवारी, फाल्गुन समर्थ, अमर सोरते, समीर राऊत, अक्षय समर्थ, शुभम अंबादे, चुडाराम राऊत, दिपक राऊत, अजित आजबले, त्रिशूल ठाकरे, वेदांत कस्तुरे, सुरज वाघाडे, रमेश आवारी, तुमदेव आवारी, सुनील कोसमशिले, तुषार म्हशाखेत्री, विलास ढोलणे, स्वप्निल मांडोलकर, राहुल सावरकर, विनोद पातळ, पुरुषोत्तम डोईजड, प्रणय सोरते, राजू भैसारे, पंकज राऊत, तुषार ठाकरे, साहिल निकुरे, आशिष मुरतेली, समीर पिंपळे, साहिल बारापात्रे, प्रभाकर मेश्राम, आर्यन बांबोळे, प्रणय बोरकर, लोकेश ठाकरे, संकेत बोरकर, सचिन मंगर, साहिल बांबोळे, हिमांशु चौधरी, सुमित डोंगरे, अनिकेत मेश्राम, प्रफुल्ल बांबोळे, कुणाल म्हस्के, अजिंक्य नगराळे, रवि आवारी, तुषार म्हशाखेत्री, रोहित कुसनाके, शुभम पदा, मोहित कोसरे, नवीन आवारी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button