कुरखेडा तालुक्यातील नदी घाटातून रेतीची अवैध वाहतूक
तालुका प्रशासन रेती तस्करांवर 'मेहरबान'? ; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
कुरखेडा : तालुक्यातील सती नदीच्या चीचटोला नान्ही, कुंभिटोला, आंधळी, गुरनोली, अंबेटोला, मालदुगी, मौशी, वाकडी, जांभूळखेडा, घाटातून रात्रीच्या सुमारास अवैध रेतीची उचल करून रेतीची वाहतूक केल्या जाते व याबाबत बातमी प्रकाशित करून कारवाई करण्यासंबंधि विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून सुद्धा साधी दखल घेतली जातं नाही यावरून तालुका महसूल प्रशासन रेती तस्करांच्या “कदरदानिया” समोर “मेहरबानी” दाखवीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोबत अवैध रेती तस्करांना रान मोकळे सोडले का असा प्रश्न ही निर्माण होत असून आता जिल्हाधिकारी यांनीच या प्रकरणकडे लक्ष देण्याची गरज आहे.
रोज रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी कुरखेडा मुख्यालय व परिसरातील छोट्या गावात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असून पोलीस प्रशासन व महसूल विभाग मूग गिळून गप्प बसल्याने महाराष्ट्र शासनाचे महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. एवढ्या बिनधास्तपणे वाहन चालत असताना सुद्धा पोलीस व महसूल विभाग महेरबान असल्याने कोणतीच कारवाई होत नसल्याने या शासनाप्रती जनता संताप व्यक्त करीत आहे.

तालुक्यातील विविध गाव, शहरात नाना प्रकारे बांधकाम सुरू आहे. यामुळे रेतीची मागणी वाढली आहे. सध्यातरी तालुक्यात रेती घाट सुरू नसल्यामुळे अवैध रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस व महसूल विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवायांचे सत्र सुरू असतानाही खुलेआम रेतीची तस्करी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रेती भरून येत असताना काही धोका तर नाही ना, याची माहिती देण्यासाठी कुरखेडा मुख्यालयात येथे दोन ते तीन जणांना तैनात करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे. विशेष म्हणजे यामध्ये घरकुल धारकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची संतापजनक बोंब सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कुरखेडा मुख्यालयातील लोकवसाहतीतून रातभर बेधडकपणे रेती भरून वाहतूक करत असताना महसूल विभाग, पोलीस प्रशासन यापासून अनभिज्ञ कसे? असा सामंजस्य प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कुरखेडा पोलिस स्टेशन व तहसीलदार वास्तव्यास असलेल्या परिसरात रेतीचे ढीग बघावयास मिळत असून तरी कारवाई शून्य आहे. मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. मात्र नाममात्र कारवाई दाखवून मोठ्या प्रमाणात रेती तस्करांना खुली छूट दिल्याचे चित्र सध्यातरी कुरखेडा तालुक्यात दिसत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असताना सुद्धा कारवाईहोत नाही हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.
जिल्हाधिकारी लक्ष देणार का?
सद्याच्या परिस्थितीमध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असताना सुद्धा संबंधित महसूल विभाग व पोलीस विभाग मूग गिळून गप्प बसल्याने संबंधित विभागावर जनतेला विश्वास नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. तरी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी कुरखेडा येथे होणाऱ्या रेती तस्करीकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी तालुक्यातील नागरीक करत आहेत.




