
आरमोरी : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली दरवर्षी विविध विभागांना पुरस्कृत करीत असते. यावर्षी १५ व्या वर्धापन दिनानिमित्य सत्र 2024- 25 मधील विविध विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाविद्यालयातील विभागांना पुरस्कृत करण्यात आले. याप्रसंगी महात्मा गांधी कला, विज्ञान व स्वर्गीय नसरुद्दीनभाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथील विद्यार्थी विकास विभागाला सत्र 2024- 25 चा उत्कृष्ट कार्यक्रम राबवल्याच्या प्रित्यर्थ पुरस्कृत करण्यात आले.
याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे त्याचप्रमाणे नागपूर येथील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचे उपस्थितीत महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गजानन बोरकर यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.



