गडचिरोलीविदर्भ

युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात २६० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

राजेरजेश्वरी फंक्शन हॉल येथे पक्ष प्रवेश सोहळा ; आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे मार्गदर्शन

सिरोंचा : तालुक्यात युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक भव्य आणि ऐतिहासिक पक्ष प्रवेश सोहळा राजेरजेश्वरी फंक्शन हॉल येथे उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण सोहळ्यात तब्बल २६० कार्यकर्त्यांनी विविध पक्षांचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) जाहीर प्रवेश केला, ज्यामुळे तालुक्यात पक्षाच्या संघटनाला मोठे बळ मिळाले आहे.

या जंगी सोहळ्याला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांना पक्षाचा दुपट्टा परिधान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या भाषणात नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि म्हटले, “तरुणांच्या जोमावर आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर पक्ष मजबूत होतो. सिरोंचा तालुक्यातील हा पक्ष प्रवेश म्हणजे विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे.”

मंचावर सिनेट सदस्य (गडचिरोली) तनुश्री आत्राम, तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, बनय्या जानगम आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्ष संघटन अधिक दृढ करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान ‘जय राष्ट्रवादी!’, ‘जय धर्मराव बाबा!’, आणि ‘जय हर्षवर्धन बाबा!’ अशा घोषणांनी फंक्शन हॉल दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली संबय्या दांदेरा, गब्बर शेख, आणि सालार सय्यद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button