गडचिरोलीविदर्भ

कोंढाळा येथे खासदार निधीतून अभ्यासिका ; डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते भूमिपूजन

देसाईगंज : गावखेड्यातील सामान्य विद्यार्थ्यांनी शिकावे आणि उच्च पदांवर विराजमान व्हावे, या उदात्त हेतूने खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी ‘गाव तिथे वाचनालय’ उभारण्याचा संकल्प केला आहे. याच ध्येयाला पुढे नेत, त्यांनी आपल्या खासदार निधीतील मोठा वाटा वाचनालय उभारणीसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रयत्नांचा भाग म्हणून, त्यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मौजा कोंडाळा (जुनी वडसा), ता. वडसा येथे अभ्यासिका मंजूर करण्यात आली आहे. या अभ्यासिका बांधकामाचे भूमिपूजन ६ मे ला खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या शुभहस्ते आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी देसाईगंज तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी पं. स. सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत, सरपंच अपर्णा राऊत, उपसरपंच गजानन सेलोटे, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी नगरसेवक आरिफ खानानी, माजी नगरसेवक विलास सुर्यवंशी, माजी नगरसेवक भाविका तलमले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते अरुण कुंभलवार, संदीप वाघाडे, पोलीस पाटील किरण कुंभलवार आणि ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा राऊत, सदस्य भुमेश्वरी गुरणुले, सदस्य नलिता वालदे, हितेश तुपाट, बाबुराव राऊत, पुंडलिक बुराडे, लालजी आंबडारे, पिसराम धोटे, निलेश दुपारे, जयंत दुपारे तसेच काँग्रेस कार्यकर्ते ताजुल उके, पिंकू बावणे, कैलास वानखेडे, विजय पिल्लेवान, पोलीस पाटील अविकांत बोदेले, संबोधी बुध्द विहारचे अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी, गजानन सेलोटे, संजय वाघाडे, सौरभ बोडेले, रोहित मेश्राम, उज्वल बोदेले, प्रहांस गेडाम, मोरू करकाडे आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button