गडचिरोलीमनोरंजनविदर्भ

आलापल्ली येथे मराठी चित्रपटासाठी आज ऑडिशन

आलापल्ली : आपल्यातील कलावंताला आंतरराष्ट्रीय स्तरावर बघण्याची संधी आणि आपल्या जिल्ह्यातील संस्कृती, कला आणि कलावंताना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी अस्तित्व स्टुडिओतर्फे आलापल्ली शहरात पहिल्यांदाच २३ फेब्रुवारी रोजी मराठी लघुपटासाठी ऑडिशन आयोजीत करण्यात आले आहे.

या ऑडिशनची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे. ऑडिशनचे ठिकाण ग्रामपंचायत आल्लापली, बस स्थानकाच्याजवळ आहे. या ऑडिशनमधे १४ ते ६५ वर्षे पुरुष, स्त्री भाग घेऊ शकतात. ऑडिशनासाठी कुठल्याही प्रकारची शुल्क लागणार नाही. निवडलेल्या कलावंताना मुख्य ऑडिशनसाठी बोलवण्यात येईल. ऑडिशनसाठी कुठल्याही स्क्रिप्टची गरज नाही. कुठल्याही विषयावर अभिनय सादर करू शकतात. नविन किंवा अनुभवी कलावंताना त्याच्या गुणांवर काम मिळेल. चित्रपटाचं शुटिंग गडचिरोली जिल्ह्यातच होईल. इच्छुक कलावंतांनी आपले फोटो आणि किमान २ मिनटांचे व्हिडीओ व्हाट्सऍपवर (चिरंजीव गड्डमवार 9404207793, श्रिकांत 8668416496) यांना पाठवावे. या ऑडिशनचा लाभ जास्तीच जास्त कलावंतांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक अस्तित्व स्टुडिओ, आलापल्लीतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button