गोंदियाविदर्भ

खर्च निरीक्षक नागेंद्र भुकया यांची बोंडरानी चेकपोस्टला भेट

गोंदिया : 64-तिरोडा विधानसभा मतदार संघातील निवडणूक तपासणी नाका SST बोंडरानी हद्द येथे तपासणी करण्यासाठी निवडणूक खर्च निरीक्षक नागेंद्र भुकया यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी उपलब्ध दस्तऐवजांची तपासणी केली. वाहन तपासणीच्या नोंदी व्यवस्थीत घेतले आहेत किंवा नाही याबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच वाहन तपासणी करताना वाहने योग्य पद्धतीने तपासले जातात का तसेच प्रत्येक तपासणी होते का याविषयी माहिती जाणून घेतली. तसेच एसटी बसेस, खाजगी बसेस व ट्रक या सर्व वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी तालुका सहायक खर्च नोडल अधिकारी जिभकाटे, सुमेध बन्सोड, डी.बी. मालधारे, विदेश आंबुले उपस्थित होते. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक अधिकारी यांच्यासोबत नोडल अधिकारी खर्च जनार्दन खोटरे, खर्च निरीक्षकांचे संपर्क अधिकारी तथा सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत इंगोले, सहायक जिल्हा खर्च नोडल अधिकारी संदिप बोरकर यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button