गडचिरोलीविदर्भ

राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषदेच्या राष्ट्रीय महासचिव पदावर माजी आ. डॉ. देवराव होळी यांची नियुक्ती

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र सहित, नजिकच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील आदिवासी समुदाय तथा दलित, ओबीसी समुदयात असलेली लोकप्रियता व सबंधीत प्रवर्गातील समस्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्या सोडविण्यासाठी त्यांच्यामध्ये असलेली तत्परता बघून राष्ट्रीय स्तरावर एसटी – एससीसाठी कार्यरत असलेली राष्ट्रीय अनुसूचित जाती – जनजाती विकास परिषदेच्या भोपाळ येथे १९ एप्रील रोजी आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात डॉ. होळी यांची राष्ट्रीय महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण मांगरिया यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.

देशातील शोषित, वंचित, मागासवर्गीय, एसटी, एससी प्रवर्गातील महीलांवर होत असले अत्याचार, आरक्षण प्राप्त समुदयाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासना विरोधात आवाज उठविणे, आदिवासी साठी संविधानात असलेल्या ५ वी व ६ वी अनुसूचिची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरकारवर दबाव टाकणे जेणे करून आदिवासीचे जल, जंगल, जमीन अधिकार हे सुरक्षित राहायला हवे, बेरोजगारी, भ्रष्टाचार बोगस शिक्षा प्रणाली ही देशासाठी अभिशाप आहे. त्याकरिता जनजागृती करणे, एसटी, एससी वर्गाचा बैकलाग भरणे आदि प्रमुख विषयावर या अधिवेशनात चर्चा करण्यात आली व परिषद या विषयावर काम करत आहे. या अधिवेशनात विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण मांगरिया, कार्यकारी अध्यक्ष प्रविण भारु गुजरात, जी. पी. मेहरा मध्यप्रदेश, राष्ट्रीय संघटक पी. सी. बेरवाल राजस्थान, राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार फुलो देवी छत्तीसगड, राष्ट्रीय संघटन सचिव सी. वी. देविदास केरळ, राष्ट्रीय सचिव ए. सुन्दरपांडियन तामिळनाडू, राष्ट्रीय महासचिव ज्योत्स्ना बैरवा गुजरात आदि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आपल्या नियुक्तीवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आभार व्यक्त करताना सांगितले कि, राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषद हि देशातील एसटी, एससीची एकमेव राष्ट्रव्यापी संघटना असून संघटनेकडून आतापर्यंत एसटी, एससीच्या आरक्षण करिता केंद्र तथा राज्य सरकार सोबत पत्र व्यवहार तथा वार्तालाप करून समस्या सोडविण्यात आल्या आहेत. अशा राष्ट्रव्यापी संघटनेने गडचिरोली सारख्या जिल्ह्याच तसेच महाराष्ट्राचे प्रतिनीधित्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल राष्ट्रीय कार्यकारणीचे आभार व्यक्त केले. माजी आ. डॉ. देवराव होळी यांच्या नियुक्तीची वार्ता गडचिरोली जिल्ह्यात माहीत होताच आदिवासी समुदाय व मित्र परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button