
भंडारा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 60 साकोली विधानसभा मतदार संघातील मौजा वलमाझरी येथे आदर्श मतदार केंद्र तयार करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अश्विनी मांझे तसेच तहसिलदार निलेश कदम, नायब तहसिलदार कु. गावंडे, गटशिक्षणाधिकारी विजय आदमने साकोली यांचे नेतुत्वात सदर पर्यावरण पुरक मतदान केंद्र उभारण्यात आले.
या केंद्रात विविध जैवविविधतेचे दर्शन व वन्यप्राण्याविषयी आपुलकी संदेश देण्यात आले आहे. विविध वन्यप्राण्याचे चित्र साकारण्यात आले आहे, जसे राज्यप्राणी शेकरू, वाघ, बिबट, हरीण, नीलगाय, रानगवा, अस्वल, मासा, पक्षी जसे सारस, गरुड, गिधाड, रोहित, घुबड, हरियल यांचे सुंदर चित्रण रेखाटण्यात आले आहे. मतदान केंद्रात सुंदर गुफा प्रवेश करताना तयार करण्यात आले आहे. सदर मतदान केंद्र सपुर्ण राज्यात आकर्षणाचे केंद्र झालेले आहे.
हे केंद्र अशोक गायधने कनिष्ठ महा. शिक्षक कुष्णमुरारी कटकवार विद्यालय साकोली यांचे मार्गदर्शानात करण्यात आले आहे. याकामी पुर्ण ग्रामपंचायत प्रशासन वलमाझरी तसेच गटसाधन केन्द्र साकोली, केन्द्रप्रमुख बि.जी भुते, संग्रामे सहा. शिक्षक यांनी सहकार्य केले.



