
पवनी येथे दीपावली स्नेहसंमेलन, तर तुमसर येथे पदाधिकारी बैठक घेणार
भंडारा : गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे १ नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पवनी आणि तुमसर येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत.
1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने पवनी जि.भंडाराकडे प्रयाण (उमरेड भिवापूर मार्ग). दुपारी 12.30 वाजता पवनी जि.भंडारा येथे आगमन व भारतीय जनता पार्टी दिपावली स्नेह मिलन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ :- लक्ष्मी रमा सभागृह,बाजार चौक,पवनी त्यानंतर दुपारी 1.30 वाजता ते 2.30 वाजेपर्यत राखीव राहातील.
यानंतर दुपारी 2.30 वाजता शासकीय वाहनाने पवनी जि.भंडारा येथून शासकीय वाहनाने तुमसर जि.भंडाराकडे प्रयाण करतील व त्यानंतर दुपारी 4.00 वाजता तुमसर जि.भंडारा पदाधिकारी यांचे समवेत आयोजित बैठकीस उपस्थिती स्थळ :- तुमसर व दुपारी 5.00 वाजता तुमसर जि.भंडारा येथून शासकीय वाहनाने भंडाराकडे प्रयाण करतील यानंतर सांयकाळी 5.45 वाजता भंडारा येथे आगमन व राखीव राहतील सोईनुसार भंडारा येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.



