गडचिरोलीविदर्भ

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; आर्य वैश्य समाज मंडळाचा उपक्रम

श्री माता वासवी कन्यका परमेश्वरी देवस्थान परिसरात कार्यक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

चामोर्शी : माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आर्य वैश्य समाज मंडळ, चामोर्शी आणि श्री माता वासवी कन्यका परमेश्वरी देवस्थान समिती, चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री माता वासवी कन्यका परमेश्वरी देवस्थान परिसरात उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री माता वासवी कन्यका परमेश्वरी यांच्या भावपूर्ण आरतीने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवर, महिला व नागरिकांच्या हस्ते परिसर फुलवण्यासाठी विविध प्रजातींच्या फळझाडांचे व शोभिवंत वृक्षांचे रोपण करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून अशा प्रकारे पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे. केवळ झाडे लावणे नव्हे, तर प्रत्येकाने किमान एका वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाला बबनराव आईंचवार, किशोर ओल्लालवार, अजय चिंतलवार, अमोल आईंचवार, विनोद पालरपवार, संजय चिंतलवार, अमित यासालवार, आकाश पालरपवार, अमोल गाण्यारपवार, बुर्लावार, रमेश भीमानावर, अखिल पालरपवार, दत्तू चॅलीयलवार, लीला आईंचवार, अनुराधा पालरपवार, रूपा चॅलीयलवार, अमृता पालरपवार, श्वेता पालरपवार, आरती भीमानवार, सुचेता चिंतलवार, शीला आलूरवार यांच्यासह आर्य वैश्य समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्य वैश्य समाज मंडळ व श्री माता वासवी कन्यका परमेश्वरी देवस्थान समिती, चामोर्शीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button