गडचिरोलीविदर्भ

माजी खा. अशोक नेते यांच्या हस्ते गडचिरोलीत विविध ठिकाणी ध्वजारोहण

गडचिरोली : माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, नेते यांचे जनसंपर्क कार्यालय, वीर बाबुराव शेडमाके स्मारक गोकुळनगर या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच घरो घरी तिरंगा, हर घर तिरंगा अंतर्गत नेते यांच्या शाहुनगर येथील निवासस्थानी सुद्धा ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ७७ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहाने आनंदाने, देश भावनेने प्रेरित होऊन, भारत मातेच्या गर्जनात साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी खा. नेते यांच्यासह शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारीवृंद यांनी तंबाखूमुक्त व धूम्रपानमुक्तीची शपथ घेतली.

यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी मोर्चाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद नरोटे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिता हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, माजी न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, ता.महामंत्री बंडू झाडे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड, नंदुजी काबरा, प्राचार्य दुर्गम,‌ पुष्पा करकाडे, वच्छला मुनघाटे, शाम वाढई, कान्होजी लोहंबरे, सुरेश राठोड, गणेश नेते, राकेश राचमलवार, माजी खासदार यांचे सोशल मिडीया प्रमुख दिवाकर गेडाम, दिनेश नंदनवार, रवि मोहुर्ले, अंशु डोईजड, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button