नागपूरमुख्य बातमीविदर्भ

गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील तीन वाघ, बिबट्याच्या मृत्यूनंतर रेड अलर्ट

संग्रहालयातील २६ बिबट, १२ वाघांची केली तपासणी

नागपूर : गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील ३ वाघ आणि एका बिबट्याचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व प्राणिसंग्रहालयात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार गोरेवाडातील २६ बिबट आणि १२ वाघांची तपासणी करण्यात आली आहे.

गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झालेल्या ३ वाघ व एका बिबट्याला मानव-वन्यजीव संघर्षानंतर डिसेंबर महिन्यात चंद्रपूर बफर झोनमधून आणण्यात आले होते. हे प्राणी आजारी पडले होते. यातच डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांचा मृत्यू झाला. गोरेवाडा रेस्क्यू सेंटरच्या प्रशासनाने या मृत प्राण्यांचे नमुने ३० डिसेंबरला भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविले होते.

२ जानेवारीला हे प्राणी बर्ड फ्त्त्यूमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल सेंटरला मिळाला. त्यानंतर केंद्र शासनाने रेस्क्यू सेंटरमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. यात गोरेवाडा झु. रेस्क्यू सेंटर, ट्रांझीट ट्रीममेंट सेंटरमध्ये काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये मृत प्राण्यांना ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यांचे फ्लेम गनने फ्लेमिंग करून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. इतर प्राण्यांना कुठलाही धोका निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button