
कोरची : तालुक्यातील समस्त आदिवासी बांधवांनी गोटूल भूमीत एकत्रित होऊन ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सप्तरंगी झेंड्याचे ध्वजारोहण करून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी तालुक्यातील हजारोच्या संख्येने आदिवासी महिला-पुरुष पिवळ्या रंगाचे वेश परिधान करून डोक्यावर पिवळी रंगाची टोपी घालुन गोटूल भूमी ते बिरसा मुंडा चौक पर्यंत एकता रॅली काढली. यानंतर बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सप्तरंगी ध्वज मान्यवरांच्या हस्ते फडकविला व जयघोष करीत शहरातील बाजार चौकात येऊन काही वेळ आदिवासी नृत्यावर आदिवासी महिला थिरकल्या त्यानंतर दररोटोली गोटूल भवनात एकता रॅली पोहचली. यावेळी कोरची पोलीसांचा बंदोबस्त होता.

कार्यक्रमाला गोंड समाज तालुका अध्यक्ष रामसुराम काटेंगे, कवर समाज तालुकाध्यक्ष भीकमजी फुलकवर, खुणारा गाव पुजारी फुलसिंग मडावी, कोरची गाव पुजारी चंदरसाय मडावी, गोंड समाज तालुका सचिव प्रमिला काटेंगे, नगराध्यक्ष हर्षलता भैसारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, पत्रकार राहुल अंबादे, चिमुरकर मॅडम, नसरुद्दीन भामानी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सियाराम हलामी, माजी जिप सदस्य अनिल केरामी, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष धनीराम हिडामी, ग्रामसभा पदाधिकारी झाडुराम हलामी, नगरसेवक मेघश्याम जमकातन, दिलीप मडावी, धर्मा नैताम, धनराज मडावी, आशिष अग्रवाल, शालिकराम कराडे, राजीमसाय कलो, तुलारामजी पोरेटी सुनील मडावी, दसरथ कोरेटी, चतुर सिंद्राम, तुलसी मडावी, अंताराम काटेंगे, भगतराम दर्रो, हिरासिंग बोगा, श्रीहरी उसेंडी, मनीष हलामी, प्रमोदीनी काटेंगे, कुमारसाय सिंद्राम, विवेक कोडापे, गणपत मंगल, रवींद्र गेडाम, जोहितराम, बखर, श्यामराव जमकातन, चंद्रसाय मडावी उपस्थित होते.
आदिवासींवर होत असलेल्या अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी सामाजिक संघटन बळकटीकरण काळाची गरज असून आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृह प्रवेश संबंधी तसेच पेसा अंतर्गत रिक्त जागा भरून आदिवासी युवकांना रोजगाराची संधी, समान नागरी कायदा, आदिवासीची गैर आदिवासींनी खरेदी केलेल्या जमिनी अशा ज्वलंत समस्या संदर्भात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त आयुक्त नीताराम कुंभरे, प्रा. अनिल होळी, गोविंद टेकाम, समाजसेविका कुमारी जमकातन यांनी उपस्थित आदिवासी समाजाला विस्तृत मार्गदर्शन केले.
यानंतर तालुक्यातील आदिवासी गटातुन बारावीत प्रथम येणारी दिव्या घोडाम, नारायण गुरुविले, राहुल केरामी, दहावीत प्रथम क्रमांक पटकावणारी प्रभा हलामी, विद्या दर्रो, भूषण मडावी, शुभांगी घोडाम, नवोदयात प्रवेश मिळविणारी क्रिष्टी हलामी, प्रणय कोराम, विशेष प्राविण्यात फिजिओथेरपी अभ्यासक्रम पूर्ण केलेला भूषण दर्रो तर आदिवासी शिक्षक म्हणून सेवानिवृत्त श्यामसिंग गंगाकचूर यांच्या मान्यवरांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सोनकलंगी यांनी केले तर संचालन प्रा. सुरेश गड्डेवार, प्रा. जया सिंद्राम तर आभार शिक्षक नंदलाल सोरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील समस्त आदिवासी संघटना व आदिवासी बांधवांनी परिश्रम घेतले.



