गोंदियाविदर्भ

‘अवयवदान हेच जीवनदान’: स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अवयवदात्यांचा सत्कार

गोंदिया : ‘अवयवदान म्हणजेच जीवनदान’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार गोंदिया जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते अवयवदान केलेल्या कुटुंबांचा सत्कार करून समाजाला एक प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने आयोजित या सोहळ्याला जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गोंदिया, बालाघाट येथील आठ अवयवदात्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मीना राजकमल रामसार, अंजु दिलीप पाठक, लक्ष्मी रमन लारोकर, चत्रुलाल हसमतराय लिलवानी, दादादेवी लालचंद बजाज, हेमा दीपक कुंदनानी, भुरकन यशवंत कटरे आणि भगवंती किशनचंद आहुजा यांचा समावेश होता.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी अवयवदानाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “एक अवयवदाता अनेक कुटुंबांना नवे आयुष्य देऊ शकतो. समाजाने या कार्यात सहभागी होणे हीच खरी देशसेवा आहे.” उपस्थित मान्यवरांनीही नागरिकांना अवयवदानाची शपथ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button