क्राईमचंद्रपूरविदर्भ

पाच टन गोमांस जप्त ; दोन आरोपींना अटक

रामनगर पोलिसांची कारवाई

चंद्रपूर : बर्फाच्या लादीत टाकून गोमांस तस्करी करणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. वरोरा नाका चौकात शुक्रवारी दुपारी नाकाबंदी करून केलेल्या या कारवाईत ५ टन गोमांससह ट्रक असा एकूण १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोहम्मद शारुख मोहम्मद सईद (२९), मोहम्मद रफिक कुरेशी (१९) रा. नागपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत.

चंद्रपुरातून गोमांस तस्करी होत असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वरोरा नाका चौकात नाकाबंदी केली. यावेळी आयसर क्रमांक एमएच ४० सीटी २०६९ हे संशयित वाहन पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना बघून चालकाने धोकादायक पद्धतीने वाहन पळविले. पोलिसांनी पाठलाग करून रोड ब्लॉक करत वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असताना बर्फाच्या लादीत ताडपत्री झाकून गोमांस ठेवले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सर्वच पाच टन गोमांस मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे, विलास बुरांडे, पंकज पोंदे आदीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button