नागपूरविदर्भ

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दाखविलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून आणि कार्यातून वंचितांच्या विकासाचा जो मार्ग दाखविला, त्याच मार्गावर राज्य शासन वाटचाल करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त नागपूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांनी ज्वलंत ठेवले. त्यांनी वंचितांचा आवाज समाजामध्ये पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. “पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही, तर कामगाराच्या तळहातावर उभी आहे,” अशी मांडणी त्यांनी आपल्या साहित्यातून केली. त्यांच्या याच विचारधारेवर चालण्याचा राज्य सरकार प्रयत्न करेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अभिजित वंजारी आणि संदीप जोशी, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह इतर मान्यवरांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button