
नागपूर : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) विदर्भात मोठा फटका बसला. त्यामुळे येथे नव्याने पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख आणि राजेंद्र शिंगणे यांच्यावर पक्षाने विदर्भप्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी याबाबतचे पत्र जारी केले आहे.



