
१३९ उमेदवारांपैकी ५४ जणांना मिळाली नियुक्ती
कोरची : कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिबिराचे आयोजन २४ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कोरची येथिल कार्यालयामध्ये आयोजीत करण्यात आले होते.
या मेळाव्यास पदविधर शिक्षक/प्राथमिक शिक्षक व डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाकरीता पात्र उमेदवारास बोलावण्यात आले होते. या शिबिरास पदविधर शिक्षक २९ प्राथमिक शिक्षक ९५ व डाटा एन्ट्री ऑपरेटर ४४ असे एकुण १३९ उमेदवार मेळाव्यास उपस्थित झाले. उपस्थित उमेदवारामधुन पदविधर शिक्षक २० प्राथमिक शिक्षक २७ व डाटा एन्ट्री ऑपरेटर ०७ असे एकुण ५४ पात्र झाले आहेत.
कोरची तालुक्यात प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणार्थी ६६ जागा रिक्त असुन या रिक्त जागेकरीता सुशिक्षित बेगोजगार अध्यापक पदविका उमेदवारानी ३१ ऑगस्ट पर्यंत पंचायत समिती कोरची येथे आपले अर्ज सादर करावे, असे गट शिक्षणाधिकारी अमित दास यांनी सुचित केले.
या शिबिराला कोरची पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अमित दास यांनी उपस्थित राहुण शासन निर्णयानुसार उपस्थित उमेदवारास भरती प्रक्रीयाचे निकष, नियुक्ती कुठे व कार्य करण्याच्या ईत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले. पुर्ण वेळ उपस्थित राहुन मेळावा योग्य व चांगल्या रितीने पार पाडण्यात आला.
या मेळाव्यास शिवाजी वाघमारे, साधन व्यक्ती विनायक लिंगायत, साधन व्यक्ती प्रमोद वाढणकर, साधन व्यक्ती मिना शहारे, रोशना बावनकुळे, साधन व्यक्ती योगेंद्र शुक्ला, युवराज मोहनकर, कुणाल कोचे, गट साधन केंद्र कोरची फामेश्वर नाटके ऑपरेटर इत्यादी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



