
नागरिकांची निवेदने स्वीकारणार, विविध विभागांची आढावा बैठक घेणार
भंडारा : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १ ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते नागरिकांची निवेदने स्वीकारून विविध शासकीय विभागांची आढावा बैठक घेणार आहेत.
१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.००: भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन. येथे ते नागरिकांची निवेदने स्वीकारतील. दुपारी १.००: जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. दुपारी ३.००: मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाच्या कामाचा आढावा घेतील. दुपारी ३.४५: भूमी अभिलेख विभागाच्या आढावा बैठकीला उपस्थित राहतील. सायंकाळी ४.३०: पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधतील. सायंकाळी ६.३० ते ८.००: मंत्र्यांसाठी राखीव वेळ. यानंतर: शासकीय वाहनाने भंडारा येथून कोराडी, जि. नागपूरकडे प्रयाण करतील.



